महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह
बिंदू नामावली नोंदणी

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन

भारत सरकार (भारत सरकारच्या पोर्टलवर)

उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे

उत्तरदायित्वास नकार

या ॲप्लिकेशनवर विविध विभागांच्या अखत्यारीतील संकेतस्थळांची माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी या माहितीचा केला जाणारा वापर अथवा वापरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी सामान्य प्रशासन विभाग स्वीकारीत नाही. कोणत्याही प्रकारची विसंगती / संभ्रमासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी वापरकर्त्याने सामान्य प्रशासन विभागाच्या संबंधित विभागाशी/अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.

अटी आणि शर्ती

या ॲप्लिकेशनची रचना, विकसन आणि देखभाल स्वामित्व हक्क सामान्य प्रशासन विभागाकडे केली जाते. या ॲप्लिकेशनवरील माहिती सामान्य प्रशासन विभागाने पुरविली आहे. ॲप्लिकेशनचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या ॲप्लिकेशनचा वापर करू नका. ॲप्लिकेशनवरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा. या ॲप्लिकेशनचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग जबाबदार राहणार नाही. या ॲप्लिकेशनवरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभाग, या जोडण्या उपलब्ध करून देत आहे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.

गोपनीयता धोरण

सर्वसाधारण नियमानुसार, हे ॲप्लिकेश तुमच्याकडून (जसे की, नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-टपालाचा पत्ता) अशी कोणतीही विनिर्दिष्ट वैयक्तिक माहिती आपोआप ग्रहण करू शकत नाही, ज्याद्वारे तुमची स्वतंत्रपणे ओळख पटविण्याची आम्हाला मुभा मिळू शकेल. हे ॲप्लिकेश तुमच्या भेटीचा अभिलेख ठेवते आणि सांख्यिकी प्रयोजनासाठी पुढील माहितीची जसे की, आंतरजाल नियमावली (आयपी) पत्ते, अधिक्षेत्राचे नाव, ब्राऊझरचा प्रकार, कार्यप्रणाली, भेट दिल्याची तारीख व वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे यांची नोंद करते. या स्थळाला हानी पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा तपास लागेपर्यंत आमच्या स्थळाला भेट देणाऱ्यांची स्वतंत्रपणे ओळख पटविण्यासाठी या पत्त्यांशी संधान साधण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही. कायदे अंमलबजावणी अभिकरणाचा सेवा प्रदात्याच्या नोंदी तपासण्याबाबतचा लेखी आदेश असल्याशिवाय, वापरकर्त्याची किंवा त्याच्या ब्राऊझिंग क्रियांची ओळख आम्ही पटविणार नाही. सामान्य प्रशासन विभागाच्या महाराष्ट्राच्या संकेतस्थळाने तुमच्याकडे वैयक्तिक माहिती पुरविण्याची विनंती केल्यास आणि तुम्ही ती देणे पसंत केल्यास ते कसे वापरावे याची माहिती तुम्हाला दिली जाईल आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी सुरक्षा प्रमाणके आचरली जातील.

स्वामित्व हक्क धोरण

या ॲप्लिकेशवरील वैशिष्ट्यपूर्ण साहित्य विनाशुल्काने, कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात विनिर्दिष्ट परवानगीच्या आवश्यकतेशिवाय उद्धृत करता येईल. साहित्य अचूकपणे उद्धृत करण्यावर आणि अप्रतिष्ठाकारक रितीचा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भाचा वापर न करण्यावर हे अवलंबून आहे. जेथे साहित्य प्रकाशित करावयाचे असेल किंवा इतरांना निर्गमित करावयाचे असेल तेथे स्त्रोतास ठळकपणे आभिस्वीकृत करणे आवश्यक आहे. तथापि त्रयस्थाचा स्वामित्व हक्क असलेले साहित्य अशी या स्थळावर ओळख पटविण्यात आलेल्या अशा कोणत्याही साहित्याच्या उद्धृतीकरणाचे प्राधिकारपत्र संबंधित स्वामित्व हक्क धारण करणाऱ्याकडून प्राप्त करण्यात यावे.

हायपरलिंकिंग बाबतचे धोरण

बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी जोडणी (लिंक)
या ॲप्लिकेशवर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेत स्थळे/ पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल अशासकीय/ खाजगी संघटनेमार्फत केली जाते. या जोडण्या तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाची बिंदू नामावली नोंदणी ॲप्लिकेशवरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य जोडणीच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्र्वसनीयता यासाठी सामान्य प्रशासन विभाग जबाबदार राहणार नाही. त्यात तुम्ही व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. या ॲप्लिकेशवर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका.

इतर संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाची बिंदू नामावली नोंदणी ॲप्लिकेशशी लिंक
अन्य संकेत स्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभाग बिंदू नामावली नोंदणी ॲप्लिकेशची जोडणी – तुम्ही आमच्या ॲप्लिकेशवरील माहितीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेत स्थळाच्या /ॲप्लिकेशच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या ॲप्लिकेशवरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवी.

Helpdesk Contact Number: 022 40293000 | Support Email ID: ccc.support@maharashtra.gov.in